आनंदाचा शिधा ; 100 रूपयात 4 वस्तू मिळनार, पहा कधी?

आनंदाचा शिधा ; 100 रूपयात 4 वस्तू मिळनार, पहा कधी?

आनंदाचा शिधा ; गोरगरिबांना सण आनंदाने साजरे करता यावेत यासाठी सुरू करण्यात आलेली ‘आनंदाचा शिधा’ ही योजना गौरी गणपती उत्सवासाठी देखील राज्य सरकार राबविणार आहे. राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ रेशनकार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप करण्यात येनार आहे. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत हे वाटप करण्यात येनार आहे.

आनंदाचा शिधा ; 4 वस्तू कोनत्या ?

मागील दोन वर्षांपासून गौरी गणपती, दिवाळी, गुढी पाडव्याच्या निमित्ताने आनंदाच्या शिध्याचे वाटप केले जात आहे. राज्यातील नागरिकांकडून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने ही योजना यंदाही राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १०० रुपये या सवलतीच्या दराने हा शिधा वाटप केला जातो. ‘आनंदाचा शिध्यामध्ये एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर तेल अशा 4 वस्तू दिल्या जातात.

कोनते लाभार्थी पात्र ?

आनंदाचा शिधा छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा आणि १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) पिवळे/केशरी शिधापत्रिका धारकांना 15 सप्टेंबरपर्यंत वाटप करण्यात येनार आहे.

 

Leave a Comment