कांद्याचे दरात मोठी तेजी येण्याची शक्यता केंद्र सरकारचा मोठा निर्णय…
कांद्याचे दरात तेजी ; सध्या कांद्याचे दर 4000 ते 4500 रूपयाच्या दरम्यान आहेत. काही ठिकाणी कांदा 5000 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. दि. 14/सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यात शुल्क काढले आणि कांद्याच्या निर्यात शुल्कात कपात केली आहे. तसेच नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी दोन महिना वेळ आहे. त्यामुळे येत्या काळात कांद्याच्या दरात चांगली तेजी येण्याची शक्यता आहे.
कांदा बाजारातील अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत कांद्याच्या दरात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. कांद्याच्या निर्यात शुल्क केंद्र सरकारने कपात करत 20% केले आहे. पुर्वी कांद्याचे निर्यात शुल्क 40% एवढे होते निर्यात शुल्क कमी केल्यामुळे निर्यात वाढेल व देशात कांद्याचे दर आणखी वाढणार असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.
निर्यात शुल्क कमी केल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांदा पोहोचेल व येत्या काही दिवसांतच कांद्याचे दराची स्थिती स्पष्ट होतील. अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या व्यापाऱ्याकडे 40% तर शेतकऱ्यांकडे 60% कांदा आहे.
नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी साधारणतः दोन महिने लागतील. आणि साठवून ठेवलेला कांदा येत्या दोन महिन्यासाठी भारताला पुरेसा नाही आणि निर्यात शुल्क कमी केल्यामुळे निर्यात वाढून कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीचे नियोजन केले तर फायद्याचे राहिल असे अभ्यासकांनी सांगितले आहे.