नमो शेतकरी योजनेचा 4 हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा…

 

नमो शेतकरी योजना ; नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली असून नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळत आहेत. नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते आतापर्यंत वाटप झाले होते, मात्र चौथ्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना बराच काळ वाट पाहावी लागली.मात्र हि प्रतीक्षा आता संपली आसून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत.

नमो शेतकरी योजना, अखेर दिलासा

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे वाटप केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परळी येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सव कार्यक्रमात करण्यात आले आहे. चौथ्या हप्त्याची तारीख जाहीर न करता अचानकपणे पैसे खात्यात जमा करण्यात येत आहेत.

नमो शेतकरी योजनेचा निधी दोन दिवसांपूर्वी मंजूर केल्यानंतर आज हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. राज्यातील ९० लाख ८८ हजार ५५६ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

अखेर चिंता मिटली

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता येणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता, मात्र पाच महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. आज 21 ऑगस्ट रोजी नमो शेतकरी चा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.

Leave a Comment