नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 ला मंजुरी या जिल्ह्याचा समावेश
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा – 2 : जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या प्रकल्पात राज्यातील एकूण 21 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली तर विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच खानदेशातील जळगाव व नाशिक अशा एकूण 21 जिल्ह्यांमध्ये अंदाजित 6000 कोटी रुपयांच्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-2 राबविण्यात येणार आहे.
(Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp) प्रकल्पाच्या टप्पा दोनमध्ये (PoCRA 2.0) समाविष्ट करण्यासाठी गावांसाठीचे निकष निर्धारित करुन त्यानुसार गावांच्या निवडीबाबतची प्रक्रिया पूर्ण करुन निवड केलेल्या एकूण 6959 गावांच्या यादीस मान्यता देण्यात आली आहे.
तर, आता राज्यात पुन्हा एकदा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राबविण्यात येणार असल्यामुळे शेतकरी बांधवानमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावांची नावे कोणती हे पाहण्यसाठी बांधव उत्सुक झालेले आहेत. (Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp)