पंजाबराव डख म्हणतात परतीचा पाऊस या भागाला झोडपणार…

पंजाबराव डख म्हणतात परतीचा पाऊस या भागाला झोडपणार…

पंजाबराव डख ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 06/ऑक्टोंबर रोजी नवीन अंदाज वर्तवला आहे. या अंदाजात त्यांनी परतीच्या पावसाची माहिती दिलीय. डख म्हणतात परतीचा पाऊस राज्यातील अनेक भागाला झोडपणार आहे. पाहुया पंजाबराव डख काय म्हणतात…

पंजाबराव डख यांनी दिलेल्या कारणांपैकी राज्यात 09/ऑक्टोंबर पासून 14/ऑक्टोंबर पर्यंत दररोज संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे. परतीचा पाऊस मुंबई, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागाला झोडपून काढिल असे डख यांनी सांगितले आहे. परतीच्या पावसाची तिव्रता विदर्भात कमी असेल असेही डख यांनी सांगितले आहे.

 

 

परतीच्या पावसाचा जोर मुंबई सह कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील बहुतांश भागात जास्त राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर कमी असेल असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना

पंजाबराव डख यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी 09/ऑक्टोंबर पर्यंत सोयाबीनची काढणी पुर्ण करावी तसेच काढलेले सोयाबीन चांगले झाकुन ठेवावे कारण 09/ऑक्टोंबर ते 14 /ऑक्टोंबर दरम्यान राज्यात परतीच्या पावसाचा जोर राहणार आहे.

 

Leave a Comment