पंजाबराव डख ; 17/ऑक्टोबर पर्यंत या भागात जोरदार पाऊस… 

पंजाबराव डख ; 17/ऑक्टोबर पर्यंत या भागात जोरदार पाऊस… 

 

पंजाबराव डख ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 07/ऑक्टोंबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार राज्यात उद्यापासून परतीचा पाऊस सुरू होणार असून राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. पुर्व विदर्भात पावसाचा जोर कमी असेल परंतु उर्वरित महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता डख यांनी वर्तवली आहे.

 

पुर्व विदर्भात दि. 12/ऑक्टोंबर ते 18/ऑक्टोंबर या दरम्यान पाऊस असेल. पूर्व विदर्भात पावसाचा जोर कमी असेल असेही डख यांनी सांगितले आहे.

पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी या भागात 09/ऑक्टोंबर पासून 17/ऑक्टोंबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असे डख यांनी सांगितले आहे. काढणी केलेले सोयाबीन चांगले झाकुन ठेवावे कारण जोरदार पावसाचा इशारा प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिला आहे.

 

या जिल्ह्यात जास्त पावसाची शक्यता – पंजाबराव डख

 

डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, लातूर, बीड, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार आहे.

 

 

 

एकंदरीत पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 09/ऑक्टोंबर पासून 17/ऑक्टोंबर पर्यंत पुर्व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असे डख यांनी सांगितले आहे.

Leave a Comment