पिकविमा बातमी ; 2023 मध्ये पिकविमा मिळाला नाही अशी करा तक्रार…
पिकविमा बातमी ; मागील वर्षी दुष्काळ तसेच इतर नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना आणि क्लेम करून सुद्धा ज्या शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना कृषी विभागाने तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांनी केलेल्या क्लेम ची तपासणी न करता विमा कंपनी ने अनेक शेतकऱ्यांचे क्लैम बाद केले होते. क्लेम रद्द केल्यामुळे पात्र असुन सुद्धा अनेक शेतकरी पिकविमा योजनेतून वगळले होते. तरी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले आणि पिकविमा आला नसेल तर लवकर आपल्या तालुकास्तरीय कृषी अधिकारी यांच्याकडून तक्रार करावी. तक्रार करण्यासाठी नमुना अर्ज खालील प्रमाणे आहे. (पिकविमा बातमी)
तालुकास्तरीय कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी 03/सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तक्रार करण्यासाठी गावाचे नाव, गट नंबर, तालुका, जिल्हा, क्लेम केलेली तारिख, Docket I’d पिकविमा नोंदणी क्रमांक तसेच तुमची लेखी तक्रार 50 शब्दात नोंदवून खाली सही करून कृषी अधिकारी यांच्याकडे द्यावे. (पिकविमा बातमी)
पिकविमा न मिळाल्याची तक्रार करण्यासाठी 03/सप्टेंबर पर्यंत कालावधी असुन तुम्हाला गेल्या वर्षीचा पिकविमा मिळाला नसेल तर लवकर कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करा. तसेच हि माहिती तुमच्या गावातील ग्रुपवर शेअर करा आणि पिकविमा मिळवण्यासाठी इतर शेतकऱ्यांना मदत करा.