फवारणी पंप लॉटरी ; फवारणी पंप अनुदानावर वाटप सुरू हे प्रमाणपत्र द्या…
फवारणी पंप लाॅटरी – 100% अनुदांनावरती बॅटरी संचलित फवारणी पंप वितरण करण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्याची सोडत ही दिनांक 09 सप्टेंबर रोजी काढण्यात आली आहे. परंतु हे निवड झालेले शेतकरी यांना अद्याप पंप मिळाले नाहीत आणि निवड झालेल्या शेतकऱ्यांना हे पंप कधी मिळणार आणि पुढील प्रोसेस काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
सन 2024-25 मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगाम मध्ये बॅटरी पंप ह्या निविष्ठा 100 % अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. मागील एक महिन्या पासुन ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पोर्टलवर सुरू होती आणि दिनांक 09 सप्टेंबर रोजी या अर्जाची सोडत काढण्यात आली आहे. जवळपास सर्व जिल्ह्यातील तालुक्यांच्या तालुका कृषि कार्यालयांमध्ये हे फवारणी पंप पुरवठा करण्यात आले आहेत फक्त काही तालुक्यांमध्ये लक्षांक च्या 50% फवारणी पंप हे पुरवठा झाले आहेत उर्वरित पंप हे 17 सप्टेंबर पर्यन्त सर्व तालुक्यांच्या कृषि कार्यालयामध्ये पुरवठा झाले असून लाभार्थ्यांना फवारणी पंप वितरत सुरू झाले आहेत.
फवारणी पंपासाठी लॉटरी मध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालया खालील कागदपत्रे सादर करावीत…
1. आधार
2. सात बारा (ज्या योजनेत निवड झाली त्या पिकाची सात बारा असणे आवश्यक)
3. पंप सुव्यवस्थित मिळाल्याचे प्रमाणपत्र ( पंप मिळाल्या नंतर द्यावे)
फवारणी पंप मिळाल्यानंतर तो व्यवस्थित असल्याची खात्री करावी आणि त्यानंतर पंप सुव्यवस्थित मिळाल्याचे प्रमाणपत्र हे तालुका कृषि कार्यालयात सादर करावे. तर, निवड झालेल्या शेतकरी बांधवांना हे पंप 100% अनुदान वरती मिळणार आहेत. पंप साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क हे आकारले जाणार नाही त्यामुळे निवड झालेल्या शेतकरी बांधवांनी पंप हस्तगत करण्यासाठी आपल्या तालुका कृषि कार्यालयात संपर्क करावा.
फवारणी पंप लॉटरी यादी आली जिल्हानिहाय यादी डाऊनलोड करा
Battery spre list ; फवारणी पंप लॉटरी यादी लागली यादीत नाव तपासा