मध्यप्रदेश मध्ये सोयाबीनला 5789 रूपये दर काय आहे यामागील सत्य पहा…
मध्यप्रदेश सोयाबीन दर ; मध्यप्रदेश मध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीनला 6000 रूपये भाव मिळावा यासाठी आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचे पडसाद देशभरात अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. राजस्थान, विदर्भात अनेक ठिकाणी सोयाबीन भावासाठी आंदोलन केले जात आहे. असे असताना गेल्या दोन दिवसापासून व्हाटसॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम (whatsaap, Facebook, Instagram) वर मध्यप्रदेश सरकारच्या नावाने एक फेक पत्रक वायरल (शेअर) केले जात आहे.
या फेक पत्रकाद्वारे मध्यप्रदेश मधील सोयाबीनला 5689 रूपये दर मिळाल्याचे मध्यप्रदेश सरकार कडून सांगितले आहे. परंतु मध्यप्रदेश सरकारने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही हे पत्रक फेक (खोटे) असल्याचे मध्यप्रदेश सरकारने स्पष्ट केले आहे. हे फेक पत्रक वायरल करणाऱ्या वर कडक कारवाईचे आदेश मध्यप्रदेश सरकारने दिले आहे.
Whatsaap, Facebook, Instagram वर हे पत्रक पाहिल्यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मध्यप्रदेश मध्ये सोयाबीनला 5789 दर मिळतोय तर महाराष्ट्रात का नाही, तरी याबद्दल मध्यप्रदेश सरकारने स्पष्ट सांगितले की हे पत्रक पुर्णपणे खोटे आहे आणि हे पत्रक वायरल करणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात येईल.
तुम्ही जर शोशल मिडिया वर असे काही पत्रक पाहिले असेल तर या पत्रकातील बातमी वर विश्वास ठेवू नका कारण हे पत्रक पुर्णपणे खोटे आहे. मध्यप्रदेश सरकारने याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे. आणि हे पत्रक वायरल करणाऱ्या वर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.