माणिकराव खुळे ; पुढचे पाच दिवस राज्यातील हवामान कसे राहिल…
माणिकराव खुळे ; हवामान विभागाचे निवृत्त तज्ञ माणिकराव खुळे यांनी पुढचे पाच दिवस राज्यातील हवामान कसे राहिल याबाबत अंदाज वर्तवला आहे. खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे आजपासून (दि.12/ऑक्टोबर) पुढे पाच दिवस म्हणजेच दि. 16/ऑक्टोंबर पर्यंत मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर तसेच संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यात ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
16/ऑक्टोबर पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असेल. 17/ऑक्टोंबर पासून पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण होईल त्याबद्दल सविस्तर अंदाज दिला जाईल असे खुळे यांनी सांगितले आहे.
परतीचा मान्सून कुठे पोहोचला – खुळे
दि. 05/ऑक्टोंबर ला महाराष्ट्राच्या वेशीवर म्हणजे नंदुरबार पर्यंत आलेला परतीचा मान्सून अजूनही तिथेच खोळंबलेला आहे. परतीचा मान्सून साठी अनुकूल परिस्थिती असली तरी जेव्हा परतीचा मान्सून नंदुरबार मधुन पुढे सरकेल तेव्हा त्याबद्दल अंदाज बांधता येईल असे खुळे यांनी सांगितले आहे.
माणिकराव खुळे यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार सध्या महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता नाही तरी घाबरण्याचे काम नाही. यापुढे पुढील हंगामातील पेरणी करण्यासाठी काही अडचणी येणार नाही. तरी हरभरा, ज्वारी पेरणी कांदा रोप टाकने यासारख्या रब्बीच्या पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती आहे असे खुळे यांनी सांगितले आहे.