कापूस सोयाबीन अनुदान यादीत नाव कसे चेक करावे cotton soyabin subsidy
कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी (Kapus Soybean Anudan Labharthi Yadi) ऑनलाईन कशी पाहायची याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले, शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतक-याच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येत आहे.
कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस ! Kapus Soybean Anudan Labharthi Yadi: कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेकरिता पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर पीक निहाय व गावनिहाय वैयक्तिक खातेदारांची यादी (Prefilled data) देण्यात आलेली आहे.
कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी (Kapus Soybean Anudan Labharthi Yadi) ऑनलाईन पाहण्यासाठी खालील सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट लिंकवर क्लिक करून ओपन करा.
https://uatscagridbt.mahaitgov.in/FarmerLogin/Login
कापूस व सोयाबीन अनुदान वेबसाईट ओपन केल्यानंतर “Farmer Search” वर क्लिक करा.
Farmer Search पुढे Farmer Login मध्ये आधार नंबर टाकून Get OTP for Aadhaar Verification वर क्लिक करा. Farmer Login OTP टाकून व्हेरिफाय करायचा आहे. पुढे राज्यातील सर्व विभागातील कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांची यादी (Kapus Soybean Anudan Labharthi Yadi) आपल्याला पाहायला मिळेल; त्यासाठी आपला विभाग, जिल्हा, तालुका व गाव निवडून सर्च वर क्लिक करा.
कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी (Kapus Soybean Anudan Labharthi Yadi) यादी मध्ये आपण शेतकऱ्याचे नाव, सर्वे नंबर, खाता नंबर, पिकाचे नाव व क्षेत्र पाहायला मिळेल.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय:
राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. 1000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु. 5000 (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मा. मंत्रिमंडळाच्या दि. 11 जुलै, 2024 च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.
सन 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा. 2024 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धतीबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा. सन 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला रु.4194.68 कोटी निधी पैकी रु.2516.80 कोटी निधी सन 2024 मध्ये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कापूस सोयाबीन अनुदान यादीत नाव चेक करण्यासाठी सध्या वेबसाइटवर काही तांत्रिक अडचणी असल्याने खालिलप्रमाणे प्रोब्लेम येत आहे तरी लवकर हा प्रोब्लेम जाईल एक दोन दिवसात पुन्हा एकदा तुम्ही चेक करा..