नमो शेतकरी योजना 5 वा हप्ता तारीख निश्चित NSMNY 5’th instolment date

नमो शेतकरी योजना 5 वा हप्ता तारीख निश्चित NSMNY 5’th instolment date

नमो शेतकरी योजना ; पिएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पुढील (पाचव्या) हप्त्यासाठी 2254 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आहे. राज्यातील पिएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जातो.

पिएम किसान योजनेचा पुढील हप्ता 05/ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातील एका कार्यक्रमाद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. आणि या पिएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या 05 व्या हप्त्याचे वितरण केले जाणार असल्याची शक्यता आहे.

नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता मिळणार का स्टेटस चेक करा..

पिएम किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळणार का स्टेटस चेक करा..

 

नमोचा पाचवा हप्ता वितरणासाठी लागणारा निधी मंजूर झाला असून राज्य सरकार पिएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्यासोबत नमोचा पाचवा हप्ता वितरण करू शकते. दि. 05/ऑक्टोंबर रोजी पिएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे मिळुन तुम्हाला 4000 रूपये खात्यात जमा होतील. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे अधिकृत घोषणा करतील.

या दोन्ही योजनेच्या लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे, आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव असने , बॅंक खात्याला आधार लिंक असने अतिशय महत्त्वाचे आहे. वरील पैकी काही प्रोसेस तुमच्या पेंटिंग असतील तर लगेच पुर्ण करा कारण त्याशिवाय तुम्हाला दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा तसेच पिएम किसान योजनेचा लाभ मिळणार का हे तुम्ही तुमच्या मोबाईल वर चेक करू शकता.

नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता मिळणार का स्टेटस चेक करा..

पिएम किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळणार का स्टेटस चेक करा..

Leave a Comment