नुकसान भरपाई ; या 12 जिल्ह्यासाठी 237 कोटी रुपये मंजूर government scheme
नुकसान भरपाई ; अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. (Maharashtra government scheme)
दि. 27/03/2023 च्या शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर निश्चित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनाने दि. 30/01/2014 अन्वये अवेळी पाऊस, कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्याना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच दि. 22/06/2023 च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. (Maharastra government farmers scheme 2024) दि. 01/01/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानी करिता सुधारित दराने 02 ऐवजी 03 हेक्टरपर्यंत मदत करण्यात आली आहे. (Farmers subsidy 2024)
GR पहा
जून/2024 ते ऑगस्ट/2024 या कालावधीत अतिवृष्टी मुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानी साठी विभागीय आयुक्त यांचेकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास पाठवले होते त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तसेच त्याच कालावधी करिता प्राप्त झालेल्या उर्वरित जिल्ह्यांकरिता 237 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
जून/2024 ते ऑगस्ट/2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 237 कोटी एवढा निधी वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. (Nuksaan bharpaai 2024)
GR पहा