पंजाबराव डख यांचा तातडीचा मॅसेज पुन्हा मुसळधार पाऊस सतर्कतेचा इशारा… 

पंजाबराव डख यांचा तातडीचा मॅसेज पुन्हा मुसळधार पाऊस सतर्कतेचा इशारा… 

 

पंजाबराव डख ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 16/सप्टेंबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजा मध्ये त्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देत 21/सप्टेंबर पर्यंत काढणीला आलेले सोयाबीन काढण्यासाठी सांगितले आहे कारण पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होणार आहे अतिवृष्टी होणार आहे तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी 21/ सप्टेंबर पर्यंत काढणीला आलेल्या सोयाबीनची काढणी पुर्ण करावी.

 

पंजाबराव डख यांनी सांगितले की 21/ पासून 02/ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी होईल ओढे, नाले, नद्या भरून वाहतील एवढा पाऊस पडेल. नदीच्या काठावर असलेल्या गावातील लोकांनी सतर्क रहावे कारण राज्यातील बहुतांश धरणे भरलेली आहे आणि मुसळधार पाऊस होताच विसर्ग सुरू होईल व नद्यांना पुर येतील. (पंजाबराव डख)

 

 

पंजाबराव डख यांनी सांगितले की 21/सप्टेंबर पासून पावसाला विदर्भातुन सुरूवात होईल व पुढे दोन दिवसांत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र ,कोकण या भागात पाऊस सुरू होईल. तरी 01/, 02/सप्टेंबर दरम्यान जसा पाऊस झाला होता तसाच पाऊस होण्याची शक्यता आहे तरी सावध रहावे. या पावसात विजाचे प्रमाण खूप जास्त असणार नाही तरी पाळीव प्राणी, आणि शेतमजूरांनी झाडाखाली, सोलार पंपाच्या प्लेट खाली थांबु नये. (पंजाबराव डख)

 

 

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 23/सप्टेंबर ते 26/सप्टेंबर या कालावधीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. तरी नदीकाठच्या गावातील नागरीकांनी काळजी घ्यावी. अतिवृष्टी होणार असल्याने अनेक ठिकाणी पुलावरून पाणी जाणार आहे तरी पुलावरून पाणी जात असताना कोणीही पुल ओलांडून जाऊ नये असे डख यांनी सांगितले आहे.

 

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विशेष सल्ला…

 

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 21/सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे तरी काढणीला आलेले सोयाबीन 20/सप्टेंबर पर्यंत काढून घ्यावे. तसेच काढलेले सोयाबीन सुरक्षित ठिकाणी झाकुन ठेवावे कारण 21/सप्टेंबर पासून पुढे आठ दिवस जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

 

अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा.

 

 

Leave a Comment