पंजाब डख ; 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान पाऊस कसा असेल याचा अंदाज हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी जाहीर केला आहे. पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज या लेखात आपण सविस्तर पाहूया…
20 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल आणि 23 ते 26 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अतीव्रुष्टीसारखा पाऊस पडेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
पंजाब डख ; हवामान अंदाज
26 ऑगस्टनंतर कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा सक्रिय होऊन पावसाला सुरुवात होईल आणि पोळ्यापर्यंत जोरदार पाऊस पडेल. म्हणजेच रक्षाबंधनापासून पोळापर्यंत राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडेल, अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.
बैलपोळापर्यंत राज्यभर मुसळधार पाऊस पडेल, हा पाऊस शेतातून पाणी बाहेर निघेल एवढा आसनार आहे… 23-26 आँगष्ट दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाब डख यांनी वर्तवली आहे.
20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढणार आहे. पंजाब डख यांनी असेही म्हटले आहे की, हा पाऊस विजांच्या कडकडाटासह होनार आहे त्यामुळे विजांच्या कडकडाट होत आसताना काळजी घ्या… विजांच्या वेळी उंच झाडाखाली बसू नका आणि सुरक्षित जागी बसावे.