रामचंद्र साबळे – पावसाचे प्रमाण कसे राहिल ला निना स्थिती पहा हवामान अंदाज…
रामचंद्र साबळे – जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी 05/ऑक्टोंबर पर्यंतचा हवामान अंदाज वर्तवला असुन राज्यात काही काळ पावसात उघडीप तर काही काळ पाऊस राहण्याची शक्यता वर्तवली आहे. पाहुया जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितलेला हवामान अंदाज.
हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या 1010 , एवढा हवेचा दाब राहिल त्यामुळे काही काळ उघडीप तर हलक्या पावसाची शक्यता असेल. दि. 01/ऑक्टोबर ते 03/ऑक्टोंबर पर्यंत कमी होतील व पुन्हा मध्यम पावसाची शक्यता राहिल. (Havaman aandaj today)
वेळी बंगालचे उपसागरावरील हवेच्या दाबातही वाढ होऊन ते 1010 हेप्टापास्कल इतके अधिक होतील. तसेच उत्तर भारतात राजस्थान, पंजाब, हरियाना, दिल्ली, मध्यप्रदेश आणि बंगालचे उपसागरावरील हवेचे दाब 1010 हेप्टापास्कल होताच पावसात पुन्हा पूर्ण उघडीप राहण्याची शक्यता आहे. त्यावेळी कमाल व किमान तापमानातही वाढ होईल. या काळात ऑक्टोबर हीट जाणवण्यास सुरुवात होईल.
आज आणि उद्या आकाश पूर्णतः ढगाळ राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता चांगली राहील. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन काही काळ उघडीप, तर काही काळ हलक्या पावसाच्या सरी असे हवामान राहील. (Ramchandra sabale havaman aandaj)
प्रशांत महासागराचे विषुववृत्तीय भागात पेरुजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 14 अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ 23 अंश सेल्सिअस इतके राहील. त्यामुळे ला-निना चा प्रभाव येत्या काळात राहील. हिंदी महासागर व बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्यामुळे बाष्पीभवनाचा वेगात वाढ होईल. (Weather forecast today ramchandra sabale)
प्रशांत महासागराचे विषुववृत्तीय भागात पेरुजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 14 अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ 23 अंश सेल्सिअस इतके कमी राहील. त्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव येत्या काळात राहील. हिंदी महासागर व बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्यामुळे बाष्पीभवनाचा वेगात वाढ होईल. (Ramchandra sabale havaman aandaj today)