रामचंद्र साबळे ; परतीचा मान्सून लांबण्याचे मुख्य कारण काय… रामचंद्र साबळे

रामचंद्र साबळे ; परतीचा मान्सून लांबण्याचे मुख्य कारण काय… रामचंद्र साबळे

रामचंद्र साबळे ; महाराष्ट्रावर दि. 14/ ऑक्टोबर रोजी दक्षिण भागावर 1006 व उत्तरेकडील भागावर 1010 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. दक्षिण महाराष्ट्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र राहण्यामुळे पावसाचे प्रमाण उत्तरेकडील भागावर हलक्या, तर दक्षिणेकडील भागावर मध्यम स्वरूपात राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

 

त्यामुळे ज्या भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल तेथे ईशान्य मॉन्सूनचा पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल. विशेषतः सांगली, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी 14 ते 16 किमी राहील. दि. 16 ऑक्टोंबर रोजी बुधवारी अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे दक्षिण कोकणात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता राहील. दक्षिणेकडील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण वाढणे शक्य आहे. त्यामुळे परतीचा मॉन्सून आणखी काही काळ राहण्याची शक्यता आहे. हवामान ढगाळ राहील. सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणातही घट होईल. हवामान बदलाचे परिणामामुळे परतीचा मॉन्सून महाराष्ट्रातून थोडा उशिराच बाहेर पडेल. 

 

प्रशांत महासागराच्या पेरूजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 14 अंश सेल्सिअस, तर हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्यामुळे परतीचा मॉन्सून लांबण्याचे मुख्य कारण आहे.

 

Leave a Comment