लाडकी बहिण योजना ; महिलांना दिलासा मोठी खुशखबर अर्जाची तारीख वाढली

लाडकी बहिण योजना ; महिलांना दिलासा मोठी खुशखबर अर्जाची तारीख वाढली

लाडकी बहिन योजना : महायुती सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिन” योजनेस अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे

महिलांना मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 ही नवीन मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. आता तुम्ही 15 ऑक्टोबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकता. मात्र हा अर्ज अंगणवाडी सेविकेमार्फतच भरावा लागणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीन योजनेला ग्रामीण ते शहरी भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सरकारने ॲप आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात केली होती. मात्र आता मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु ऑनलाइन किंवा ॲपद्वारे अर्ज करणे शक्य नाही. आता केवळ अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज करावा लागणार आहे.

लाडकी बहिण योजनेची मुदत तिसऱ्यांदा वाढवली

लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आधी 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 होती. मात्र नंतर ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा मुदत वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली. आता तिसऱ्यांदा 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

1) आधार कार्ड
2) नागरिकत्व/जन्म प्रमाणपत्र
3) उत्पन्न प्रमाणपत्र
4) अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र
5) बँक पासबुक
6) अर्जदाराचा फोटो

महिला अर्जदार महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला अर्ज करू शकतात. यापूर्वी महिला लाभार्थ्यांचा वयोगट 21 ते 60 वर्षे होता. नवीन बदलानुसार ते 21 वरून 65 वर्षे करण्यात आले आहे. लाडकी बहिन योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.

 

Leave a Comment