हवामान अंदाज ; आणखी किती दिवस पाऊस पंजाबराव डख लाईव्ह

हवामान अंदाज ; आणखी किती दिवस पाऊस पंजाबराव डख लाईव्ह

 

हवामान अंदाज ; मराठवाड्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 02/ऑक्टोंबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. सध्या सोयाबीन काढणी सुरू आहे आणि अशातच पंजाबराव डख यांनी पावसाचा इशारा दिला आहे. (Panjabrao dakh havaman aandaj live)

 

पंजाबराव डख म्हणतात 07/ऑक्टोबर पर्यंत पाऊस

 

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी या भागात 07/ऑक्टोंबर पर्यंत विखुरलेल्या स्वरूपात भाग बदलत पावसाची शक्यता असेल. धाराशिव, नगर, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, वाशिम, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात 07/ऑक्टोंबर पर्यंत पावसाचा जोर अधिक असेल.

 

सोयाबीन काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांना वातावरण पाहून काढणीचे नियोजन करावे असे डख यांनी सांगितले आहे. 07/ऑक्टोंबर पर्यंत विजेच्या कडकडाटासह भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे.

 

Leave a Comment