हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यात अती मुसळधार पावसाचा अंदाज – माणिकराव खुळे
हवामन अंदाज ; आजपासुन 26 ते 27 सप्टेंबर पर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात विजा व गडगडाटीसह जोरदार ते अति जोरदार परतीच्या पावसाची शक्यता असुन मराठवाडा व विदर्भात मात्र ही परिस्थिती रविवार दि. 30 सप्टेंबर पर्यन्त टिकून राहण्याची शक्यता जाणवते. (माणिकराव खुळे Meteorologist (Retd) IMD Pune)
रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई उपनगर ठाणे पालघर नंदुरबार धुळे नाशिक नगर पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड अश्या 16 जिल्ह्यात आज रात्रीदरम्यान अति जोरदार किंवा काही ठिकाणी 20 सेमी पेक्षाही अधिक अश्या अत्याधिक जोरदार परतीच्या पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः मध्य महाराष्ट्रातील पर्जन्यच्छायेतील प्रदेशात ह्या परतीच्या पावसाचा जोर अधिक जाणवेल. (माणिकराव खुळे Meteorologist (Retd) IMD Pune)
कोकणातील मुंबई शहर व उपनगर, ठाणे व उपनगर, पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या 07 जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर अश्या 06 जिल्ह्यात अश्या एकूण 13 जिल्ह्यातील तापी, गोदावरी व कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात येत्या दोन दिवसात पूर परिस्थिती जाणवू शकते असे माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.
पावसाचा जोर कधी कमी होण्याची शक्यता – माणिकराव खुळे
खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर व सोलापूर अश्या 10 जिल्ह्यात शनिवार दि. 28 सप्टेंबर पासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. (माणिकराव खुळे Meteorologist (Retd) IMD Pune)