हवामान अंदाज पंजाब डख ; सप्टेंबरच्या सुरुवातीलाच पावसाचं थैमान, एवढे दिवस मुक्काम…
हवामान अंदाज पंजाब डख ; सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कसा राहील याबाबत अंदाज पंजाब डख यांनी जाहीर केला आहे,पंजाबराव डख यांचा अंदाज या लेखातून सविस्तर पाहुयात….
राज्यात 1 ते 5 सप्टेंबर मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. आजपासूनच जोरदार पावसाला सुरुवात होईल आणि हा 5 सप्टेंबरपर्यंत धो-धो बरसेल अशी शक्यता पंजाब डख यांनी व्यक्त केली आहे.
हवामान अंदाज पंजाब डख
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, तसेच कोकणात 1 ते 5 सप्टेंबर मुसळधार पाऊस पडेल. या पावसात जायकवाडी धरन तसेच छोटे छोटे तळे भरून जातील..हा पाऊस मोठे थेंब, वारे आणि विजांसह आसेल त्यामुळे शेतकऱ्यांनी विजा चमकत आसताना झाडाखाली बसू नका अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे…
राज्यातील सर्वच जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस होनार आसून या पावसात मोठे थेंब, विजा आणि वारे आसनार आहे… या पावसात तलाव, धरनं, विहीरी भरून जातील अशी माहीती पंजाब डख यांनी दिली आहे.