Ladki bahin yojana लाडकी बहिण योजनेच्या बाबतीत बॅंकाना महत्त्वाचे आदेश

Ladki bahin yojana लाडकी बहिण योजनेच्या बाबतीत बॅंकाना महत्त्वाचे आदेश ….

 

Ladki bahin yojana नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ 14 ऑगस्ट पासून पात्र महिलांना मिळत आहे . दोन हप्त्यांचे एकत्रितपणे वितरण करण्यात आले असून , एकूण 3000 हजार रुपये महिलांना मिळाले आहे .

काही महिलांनी कागदपत्रे अपलोड करताना , जुने बॅंक खाते दिले आहे , जे खाते ऑक्टिव नाही . त्यामुळे महिलांना बॅंकेतून पैसे काढता येईना. ही महिलांची समस्या, तक्रार राज्य सरकार कडे गेली. या मागणीला पाठिंबा देऊन राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेचा लाभ प्रत्येक महिलांना मिळावा याबाबत बॅंकाना महत्त्वाचे आदेश दिले आहेत .

राज्य सरकारने ऑक्टिव नसलेल्या बॅंक खात्याला ऑक्टिव करून , पात्र महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्यात यावा , असा आदेश बॅंकाना दिला आहे . लाडकी बहिण योजनेची रक्कम खात्यावर जमा झाली असता , लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये , असाही आदेश बॅंकाना दिला आहे . लाडकी बहिण योजनेचा हप्ता हा पात्र महिलांना मिळायलाच हवा , यासाठी राज्य सरकार आतोनात प्रयत्न करीत आहे .

अनेक महिलांच्या खात्यावर कर्ज आहे , बॅंकेचे प्रलंबित कर्ज असलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने बॅंक खाते गोठविण्यात आले असल्यास, सदर बॅंक खाते तात्काळ सुरू करण्यात यावे , व लाडकी बहिण योजनेच्या लाभाची रक्कम लाभार्थी ला देण्यात यावी . महिलांच्या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेऊन , बॅंकाना आदेश दिला आहे . या निर्णयामुळे राज्यातील महिलांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment