Ladki bahin yojna ; लाडकी बहिण योजनेचा 3 रा हप्त्याची तारिख निश्चित…
Ladki bahin yojna ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सर्व महाराष्ट्रात लोकप्रिय आणि चर्चेचा विषय झाला आहे. आतापर्यंत दो कोटी महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. तसेच 30/सप्टेंबर पर्यंत या योजनेसाठी नोंदणी करता येणार आहे. नवीन नोंदणी फक्त अंगणवाडी सेविका कडे केली जात आहे तरी महिलांनी हे लक्षात घ्यावे..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट चे मिळुन 3000 रूपये जमा केले आहे. आणि 30/सप्टेंबर पर्यंत पुढील हप्ता जमा केला जाणार आहे. तसेच ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही अशा महिलांना 4500 रूपये मिळतील आणि ज्या महिलांना 3000 रूपये मिळाले आहेत अशा महिलांना 1500 रूपये मिळतील.
तरी अनेक महिलांच्या बॅंक खात्याला आधार लिंक नाही त्यामुळे पैसे अडकले आहे तरी ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्या महिलांनी आधार सिडींग स्टेटस ॲक्टिव आहे का चेक करावे आणि ॲक्टिव नसेल तर आधार सिडींग स्टेटस ॲक्टिव करावे म्हणजे तुम्हाला पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही.
मुख्यमंत्री एक शिंदे यांनी लाडक्या बहिणींना पैसे कधी येणार याबाबत लाईव्ह माहिती दिली आहे तरी 30/सप्टेंबर पर्यंत तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होतील त्यासाठी तुम्हाला बॅंक खात्याला आधार सिडींग स्टेटस ॲक्टिव करावे लागेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली माहिती खालील YouTube video मध्ये पहा…