Ladki bahin yojana लाडकी बहिण योजनेचे 4500 या तारखेला खात्यात जमा होणार

Ladki bahin yojana लाडकी बहिण योजनेचे 4500 या तारखेला खात्यात जमा होणार….

Ladki bahin yojana नमस्कार, राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपये मानधन मिळाले आहे. परंतु अनेक महिलांचे अर्ज कागदपत्रांची पूर्तता नसल्याने उशिरा अपलोड करण्यात आले होते. काही महिलांचे आधार सिडिंग ऑक्टिव नसल्याने लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा महिलांना आता एकत्र जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे मिळून एकत्र 4500 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

 

ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले आहेत अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते मिळणार नाही. फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहे म्हणजेच सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना 1500 मिळणार आहे. याशिवाय ज्या महिलांना 3000 हजार रुपये मानधन मिळाले आहे, अशा महिलांना पण 1500 रुपये जमा होणार आहे.

 

लाडकी बहिण योजनेचे 4500 हजार रुपये जमा होण्याची तारीख निश्चित झाली आहे. येत्या 29 सप्टेंबर 2024 या दिवशी आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांना एकत्र 4500 हजार रुपये मानधन जमा होणार आहे.

 

राज्यात जवळपास 1 कोटी 5 लाखांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 98 लाख अर्जाला राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 सप्टेंबर ही आहे. ज्या महिलांनी लाडकी बहिण योजनेचा अर्ज दाखल केला नाही, अशा महिलांनी 31 सप्टेंबर पर्यंत अर्ज दाखल करून, लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यावा.

 

 

Leave a Comment