Soyabin Kapus Anudan ; या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात… 

Soyabin Kapus Anudan ; या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात...

Soyabin Kapus Anudan ; गेल्या हंगामात कापुस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रूपये आर्थिक मदत केली जात आहे. कापूस आणि सोयाबीन ची नोंद असलेल्या आणि कृषी सहाय्यका कडे अर्ज करून ईकेवायसी पुर्ण केलेल्या शेतकऱ्यांना आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. एका शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कापूस आणि सोयाबीन मिळुन 20 हजारापर्यंत मदत मिळणार आहे. आज दि. 30/सप्टेंबर रोजी हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

 

कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना गेल्या वर्षी बाजारभाव तसेच दुष्काळामुळे मोठा फटका बसला होता. अनेक दिवसांपासून शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना एकुण 4500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आधार लिंक असलेल्या आणि अनुदानास पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरणास सुरुवात झाली आहे.

2023 च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत विशेष अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने तात्काळ हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. पहिल्या टप्प्यात 49 लाख 50 हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये 2398 कोटी 93 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

 

राज्यातील एकूण सुमारे 96 लाख खातेदार या योजनेतून लाभासाठी पात्र असून, आधार संलग्न माहिती व अन्य प्रक्रिया पूर्ण होतील, तसे टप्प्याटप्प्याने उर्वरित शेतकरी बांधवांना देखील लाभ वितरित केला जाईल.

 

 

Leave a Comment