Weather forecast ; अरबी समुद्रात कमी दाब ; तीन दिवस पावसाची शक्यता

Weather forecast ; अरबी समुद्रात कमी दाब ; तीन दिवस पावसाची शक्यता

 

Wedhar forecast ; हवामान विभागाने राज्यातील काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर दुपारी ऑक्टोबर हीटही जाणवत आहे. दुसरीकडे माॅन्सूनचा परतीचा प्रवास सलग पाचव्या दिवशी म्हणजेच आजही थबकलेला होता.

 

अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची प्रणाली पुढील 2,3 दिवसांत आणखी तीव्र होऊन वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा आहे. काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. (IMD weather forecast) 

 

हवामान विभागाने आज राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर विदर्भातील बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

शनिवार दि. 12/ऑक्टोंबर रोजी सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. रविवारी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Comment