Kapus soyabin anudan ; कापूस सोयाबीन अनुदान या बॅंक खात्यात जमा होणार

Kapus soyabin anudan ; कापूस सोयाबीन अनुदान या बॅंक खात्यात जमा होणार

Kapus soyabin anudan ; गेल्या हंगामात कापुस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रूपये आर्थिक मदत केली जात आहे. कापूस आणि सोयाबीन ची नोंद असलेल्या आणि कृषी सहाय्यका कडे अर्ज करून ईकेवायसी पुर्ण केलेल्या शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. एका शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कापूस आणि सोयाबीन मिळुन 20 हजारापर्यंत मदत मिळणार आहे. दि. 30/सप्टेंबर पासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा झाले आहे.

कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना गेल्या वर्षी बाजारभाव तसेच दुष्काळामुळे मोठा फटका बसला होता. अनेक दिवसांपासून शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना एकुण 4500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आधार लिंक असलेल्या आणि अनुदानास पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरणास सुरुवात झाली आहे.

सोयाबीन कापूस अनुदानाचे पैसे तुमच्या आधारशी जे बॅंक खाते लिंक आहे त्या बॅंक खात्यात DBT कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा केले जाणार आहेत. तुमचे आधारशी कोणते बॅंक खाते लिंक आहे हे खालील प्रमाणे चेक करा.

कापूस सोयाबीन अनुदान या खात्यात जमा होणार चेक करा

🟣 सर्वप्रथम आधार च्या अधिकृत संकेतस्थळावर जा.. (https://uidai.gov.in/)

🔴 त्यानंतर माझा आधार या पर्यायावर क्लिक करा.

🟠 पुढे ड्रॉप डाऊन मेनुमधुन आधार सेवा या पर्यायावर क्लिक करा.

🟡 त्यानंतर आधार आणि बॅंक खाते लिंकिंग स्टेट्स तपासा वर क्लिक करा.

🔵 त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका व सबमिटवर क्लिक करा.

🟣 त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक otp येईल तो टाका.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव आहे का हे दिसेल तसेच कोणत्या बॅंकेला आहे हे सुद्धा पाहता येईल. जर आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव नसेल तर ॲक्टिव करून घ्या. राज्यातील एकूण सुमारे 96 लाख खातेदार या योजनेतून लाभासाठी पात्र असून, आधार संलग्न माहिती व अन्य प्रक्रिया पूर्ण होतील, तसे टप्प्याटप्प्याने उर्वरित शेतकरी बांधवांना देखील लाभ वितरित केला जाईल.

कापूस सोयाबीन अनुदान या खात्यात जमा होणार चेक करा

 

Leave a Comment