हरभरा तणनाशक हरभरा उगवणपुर्व तननाशक हे वापरा harbhara tananashak 

हरभरा तणनाशक हरभरा उगवणपुर्व तननाशक हे वापरा harbhara tananashak

 

Harbhara tananashak आपल्या महाराष्ट्रात रब्बी हंगामात हरभरा पिकाची पेरणी/लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. हरभऱ्याचे चांगले उत्पादन घेण्यासाठी वेळेवर पेरणी, खत व्यवस्थापन, चांगल्या बियाण्याची निवड, पाण्याचे योग्य नियोजन तसेच तन व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. हरभरा पिकात उभ्या पिकात फवारण्या साठी तननाशक उपलब्ध नसल्याने पेरणी मागे म्हणजे उगवणपुर्व तननाशकाची फवारणी केली जाते. तरी उगवणपुर्व तननाशकाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया..

 

 

पुर्वी शेतकरी कोणत्याही पिकाचे तन व्यवस्थापन करताना कोळपणी किंवा खुरपणी करून पिकाची आंतरमशागत करत होते. पण आता वेळेवर मजुरांची उपलब्धता होत नसल्याने तसेच खुरपणी करण्यासाठी खर्च जास्त येत असल्याने शेतकरी तननाशकाला प्राधान्य देतात. हरभरा पिकात पेरणी मागे कोणते तननाशकाची फवारणी करावी तसेच फवारणी चे प्रमाण किती असावे हे पाहु…

 

हरभरा तननाशक (Pendamethalin 38.7%) harbara tannashak 👇👇

हरबरा पिकामध्ये इतर पिकाप्रमाणे उगवनीनंतर वापरण्यात येणारे तननाशक उपलब्ध नसल्याने हरबर्याचे तनव्यवस्थापन करण्यासाठी पेरणी झाल्याबरोबर उगवनपुर्व तननाशक पेंडीमेथलीन (Pendamethalin 38.7%) हा घटक असलेले तननाशक वापरावे. पेरणीमागे तननाशक वापरताना एक एकरसाठी 150 लिटर पाण्यामधे 700ml पेंडीमेथलीन मिसळून फवारणी करावी. कंपनी ने दिलेल्या प्रमाणात फवारणी करावी कमी अधिक औषधी वापरु नये.(Pendamethalin 38.7%)

 

पेंडीमेथलीन या घटकांची फवारणी करताना चांगल्या रीझल्टसाठी एक एकर साठी 150 लिटर पाण्यात 700 ml पेंडीमेथलीन मिसळून फवारणी करावी. पाणी किंवा औषध कमी जास्त करु नये. तसेच फवारणी करताना जमीनीत ओलावा असने आवश्यक आहे. पेरणी मागे लगेच फवारणी करावी या फवारणी नंतर हरभऱ्यात 40 दिवस तन उगवत नाही..

Leave a Comment