Solar pump ; मागेल त्याला सोलार पंप ; या शेतकऱ्यांना शेवटची संधी
Solar pump ; शेतकऱ्यांना दिवसा पिकाला पाणी देण्याची सोय व्हावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कडून 90% , 95% अनुदानावर सोलार पंप दिले जातात. यामध्ये पिएम कुसुम योजना, मागेल त्याला सोलार पंप तसेच महावितरण च्या माध्यमातून सोलार पंप योजना राबविल्या जातात. राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत महावितरणच्या माध्यमातून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जाणार आहे. (Solar pump yojna 2024)
हमीभावाने खरेदी सुरू सोयाबीन 5000 पार होणार का – बाजार अभ्यासक
सोलार पंपासाठी अर्ज केलेल्या आणि पात्र शेतकऱ्यांना सेल्फ सर्वे आणि पेमेंट हि प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. महावितरणकडून पात्र शेतकऱ्यांना सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे मेसेज दिले आहे आणि 24/ऑक्टोंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कालावधी दिला आहे. जर तुम्ही सोलार पंपासाठी अर्ज केला असेल आणि तुम्हांला सेल्फ सर्वे आणि पेमेंट साठी मेसेज आला असेल तर 24/ ऑक्टोंबर पर्यंत सेल्फ सर्वे आणि पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज बाजूला काढून नवीन शेतकऱ्यांना संधी देण्यात येईल.
सोलार पंपासाठी अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक मेसेज येतो तसेच तुमचा अर्ज मंजूर आहे का हे तुम्ही ऑनलाईन सुद्धा तपासून पाहु शकता. सेल्फ सर्वे आणि पेमेंट 24/ऑक्टोंबर पर्यंत पूर्ण न केल्यास तुम्ही पात्र असताना सुद्धा तुम्हाला सोलार पंप मिळणार नाही. सोलार पंप साठी पात्र शेतकऱ्यांना महावितरणने 24/ऑक्टोंबर पर्यंत सेल्फ सर्वे आणि पेमेंट साठी कालावधी दिला आहे.