ई पिक पाहणी ; नमस्कार शेतकरी मित्रांनो , भाषांतर योजनेअंतर्गत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 हजार रुपयांची मदत दिली जात आहे , ही मदत दोन हेक्टर च्या मर्यादित आहे.कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ई पिक पाहणी करण्याची अट घालण्यात आली होती . ज्या शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी पूर्ण केली , अशा शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन पिकाचे अनुदान मिळत आहे , परंतु अनेक शेतकऱ्यांना सर्वर व्यवस्थित सुरू नसल्याने इ पिक पाहणी पूर्ण करणं शक्य झाले नाही .
ई पिक पाहणी
नेटवर्क मुळे पिक पाहणीच्या नोंदी पासून अनेक शेतकरी वंचित राहू नयेत म्हणून, ई पिक पाहणी च्या दाखवण्याऐवजी सातबारा नोंदीवरून 5000 हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे , अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे .
बीड जिल्ह्यातील परळी येथील कृषी महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कापूस आणि सोयाबीन पिकाची ई -पिक-पाहणी या विषयावर व्याख्यान केले . यावेळी त्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकाची ई -पिक-पाहणी ची अट रद्द करण्याची घोषणा केली आहे .
शिंदे म्हणाले की, सातबारावर आहे त्याच पिकांच्या नोंदींप्रमाणे कापूस आणि सोयाबीन पिकाला अनुदान देण्यात येईल . परंतु अद्याप राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आला नाही.पण मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात ई -पिक-पाहणी ची अट रद्द करण्याची घोषणा केली आहे .