Annpurna yojna ; मोफत गॅस योजनेत मोठे बदल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना
Annpurna yojna ; राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत दिले जाणार आहे. सदर योजना मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना या नावाने राबविण्यात येत आहे. दि.30/07/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची कार्यपध्दती निश्चित केली आहे.
सध्या काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे, यास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, जेणेकरुन अन्नपूर्णा योजनेंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल. त्यामुळे मुळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी, दि. 01 जुलै, 2024 पर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅसजोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅसजोडणी हस्तांतर केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील.