Battery spre pump ; बॅटरी फवारणी पंपासाठी लाॅटरी मध्ये निवड झाली पुढे काय

Battery spre pump ; बॅटरी फवारणी पंपासाठी लाॅटरी मध्ये निवड झाली पुढे काय

 

Battery spre pump ; कापूस आणि सोयाबीन या तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ होण्यासाठी राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बॅटरी फवारणी पंप 100% अनुदानावर देण्यात येणार आहे. फवारणी पंपासाठी महाडीबीटि पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. फवारणी पंपाच्या लक्षाकांपेक्षा अधिक अर्ज आल्यावर कृषी विभागाने फवारणी पंपाचे वितरण लाॅटरी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला असून 09/सप्टेंबर रोजी लाॅटरी पद्धतीने पात्र शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आली.

 

लाॅटरी पद्धतीने निवड झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप फवारणी पंपाचे वितरण केले नाही. शेतकऱ्यांना फवारणी पंप सोडवुन घेण्यासाठी काय करावे लागणार आणि फवारणी पंप कधी वितरीत होणार याबाबत माहिती पाहुया.

 

राज्य पुरस्कृत कृषी योजनेअंतर्गत कापूस आणि सोयाबीन या तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना 100% अनुदानावर फवारणी पंप देण्यात येत असुन सर्व जिल्ह्यातील लक्षाकांनुसार फवारणी पंप तालुका कृषी कार्यालयात पुरवठा करण्यात आले आहे. परंतु काही जिल्ह्यात लक्षांकाच्या 50% फवारणी पंप पुरवठा झाले आहे. उर्वरित 50% फवारणी पंप 17/सप्टेंबर पर्यंत पुरवठा केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

 

तालुका कृषी कार्यालयात फवारणी पंप वितरीत होताच लाॅटरी पद्धतीने निवड झालेल्या लाभार्थ्यांना 18/सप्टेंबर पासून फवारणी पंप वितरीत केले जातील अशी शक्यता आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना फवारणी पंप सोडवुन घेण्यासाठी काही कागदपत्रे सादर करावी लागतात.

 

फवारणी पंप घेण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात हि कागदपत्रे जमा करा.

 

1) आधार कार्ड

2) सातबारा (कापूस किंवा सोयाबीन ची नोंद असने आवश्यक)

3) फवारणी पंप सुस्थितीत मिळाल्याचे प्रमाणपत्र (पंप घेतल्यावरच द्यावे)

 

फवारणी पंप 100% अनुदानावर असुन यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. लाॅटरी पद्धतीने फवारणी पंपासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांनी तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधावा. तसेच हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुप मध्ये सामिल व्हा.

Leave a Comment