Central government ; सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा.

Central government ; सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा..

Central government ; सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने आज दिलासा देत दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. अनेक दिवसांपासून कांद्याचे दर पडलेले होते तसेच सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विकले जात होते. सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी पाहता आज केंद्र सरकारने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहे त्यामुळे सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहिसा दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने कांदा आणि सोयाबीन बाबतीत कोणते निर्णय घेतले पाहुया सविस्तर माहिती.

 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा देत कांद्यावर लावलेले 40 % निर्यात शुल्क कमी करत 20% केले आहे. अनेक दिवसांपासून कांद्यावर निर्यात शुल्क लावल्याने कांदा निर्यातीला अडचणी येत होत्या तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात शुल्क घटवल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. आता निर्यात शुल्क 40% वरुन 20% केले आहे.

 

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा.

सोयाबीन अनेक दिवसांपासून हमीभावापेक्षा कमी दरात विकले जात आहे तरी केंद्र सरकारने आज राजस्थान आणि मध्यप्रदेश मधील सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. आता पुढे 90 दिवस सोयाबीन 4892 या हमीभावाने नाफेड च्या माध्यमातून खरेदी केली जाणार आहे.

 

खाद्य तेलाचे आयात शुल्क 20% नी वाढवले

तसेच सोयाबीनचे बाजारभाव पडण्यामागे असलेले महत्त्वाचे कारण म्हणजे खाद्यतेलाची आयात. आता खाद्य तेलाच्या आयातीवर असलेले आयात शुल्क 20% नी वाढवले आहे. खाद्य तेलाचे आयात शुल्क 20% नी वाढवल्याने आयातीमध्ये कपात होईल व देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल.

केंद्र सरकारने कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहे या निर्णयामुळे सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment