Crop insurance ; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 200 कोटींचा थकित पिकविमा मिळणार
परभणी जिल्ह्यातील 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 2021 मधील 200 कोटींचा पिकविमा वितरनाचा मार्ग मोकळा झाला आसून लवकरच याचे वाटप करण्यात येनार आहे. शेतकऱ्यांनो केंद्रीय क्रुषीमंत्री मराठवाडा दौऱ्यावर आसताना पिकविमा न मिळाल्याची तक्रार केली होती..
यासाठी तांत्रिक सल्लागार समीतीची बैठक बोलावन्यात आली आणि तांत्रिक सल्लागार समीतीने पिकविमा कंपनीला एका आठवड्याची मुदत देत थकबाकी वितरित करन्यास सांगितले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2021 चा पिकविमा मिळन्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा तसेच विभाग स्तरावरील विविध अधीक्षकांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देउनही विमा कंपन्याने नकार दिल्याने शेतकरी बर्याच दिवसापासून पिकविम्याच्या प्रतीक्षेत होते. अखेर केंद्रीय क्रुषीमंत्र्याच्या मध्यस्थीने हा प्रश्न सुटला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहे.