Crop insurance ; अग्रीम पिकविम्यासाठी या चार जिल्ह्यात अधिसूचना

Crop insurance ; अग्रीम पिकविम्यासाठी या चार जिल्ह्यात अधिसूचना

Crop insurance ; यंदा ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबर च्या सुरुवातीला राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही जिल्ह्यात ढगफुटी झाली तर काही जिल्ह्यात वारे आणि जोरदार पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान ग्रस्त भागातील पंचनामे करणे सुरू आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असून आता जिल्हास्तरीय पिकविमा समितीने केलेल्या सर्वेक्षणात ज्या जिल्ह्यात 50% पेक्षा अधिक नुकसान झाले आहे त्या जिल्ह्यात अधिसूचना काढून 25% अग्रीम पिकविमा मंजूर केला आहे.

अतिवृष्टीने मोठा फटका बसलेल्या यवतमाळ, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील सर्व महसुल मंडळात 25% अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. अधिसूचना निर्गमित करून अग्रीम पिकविम्यासाठी पात्र शेतकऱ्यांना 25 % पिकविमा वितरित करण्यात येणार आहे.

इतर जिल्ह्यात नुकसानीची पाहणी सुरू आहे आणि 50% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यात 25% अग्रीम पिक विमा मंजूर केला जाईल. नुकसानीची पाहणी पुर्ण झाल्यावर इतर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिसूचना काढली जाईल.

राज्यात सर्वच जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे मोठे नुकसान झाले आहे. जसे इतर जिल्ह्याची माहिती मिळेल तसेच त्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करू तरी अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुप मध्ये सामील व्हा…

Leave a Comment