Crop insurance claim ; या जिल्ह्याचा 25% अग्रिम पिक विमा मंजूर…
Crop insurance claim ; यंदा ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबर च्या सुरुवातीला राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही जिल्ह्यात ढगफुटी झाली तर काही जिल्ह्यात वारे आणि जोरदार पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान ग्रस्त भागातील पंचनामे करणे सुरू आहे. अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील बहुतांश क्षेत्र बाधित झाले आहे आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिकविमा मंजूर केला आहे.
अतिवृष्टीने मोठा फटका बसलेल्या जालना जिल्ह्यातील सर्व महसुल मंडळात 25% अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. अधिसूचना निर्गमित करून अग्रीम पिकविम्यासाठी पात्र शेतकऱ्यांना 25 % पिकविमा वितरित करण्यात येणार आहे.
नुकसानीची पाहणी करून 50% पेक्षा अधिक नुकसान झालेले पाहता जालना जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळासाठी 25% अग्रीम पिक विमा मंजूर केला आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने हा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या कडे सुपुर्त केला आहे.
नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने दिलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी 25% अग्रीम पिकविम्यासाठी अधिसूचना काढली आहे.
राज्यात सर्वच जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे मोठे नुकसान झाले आहे. जसे इतर जिल्ह्याची माहिती मिळेल तसेच त्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करू तरी अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुप मध्ये सामील व्हा…