Dana cyclone ; चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही माणिकराव खुळे

Dana cyclone ; चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही माणिकराव खुळे

 

Dana cyclone ; बंगालच्या उपसागरात थायलंडच्या पश्चिम किनाऱ्यावरील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून 23/ऑक्टोंबर पर्यंत चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.हे संभाव्य चक्रीवादळ ओडिशा व पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे जाणार असल्याने महाराष्ट्राला धोका नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

 

बंगालच्या उपसागराच्या उत्तर अंदमान समुद्रामध्ये 21/ऑक्टोंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असल्याने उद्या (23/ऑक्टोंबर) पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

 

24/ऑक्टोंबर ला ही वादळी प्रणाली ओडिशा आणि पश्चिम बंगालकडे जाण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. यातच पश्चिम-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, भारताच्या किनाऱ्यापासून दूर जाणारी ही प्रणाली निवळू लागली आहे.

 

हवामान विभागातील निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, की बंगालच्या उपसागरात थायलंडच्या पश्चिमेला कमी दाबाची प्रणाली तयार होणार आहे. त्यानंतर ती वायव्येकडे सरकत ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत येणार आहे.

 

जमिनीवर आल्यानंतर ही वादळी प्रणाली बांगलादेशकडे जाण्याची शक्यता आहे. त्याचा महाराष्ट्रावर प्रभाव पडणार नसल्याने महाराष्ट्राला धोका नाही. परिणामी राज्यात कोणतीही हानी होणार नाही.

राज्यात सध्या सुरू असलेला पाऊस दोन दिवस कायम राहणार असून, बुधवारपासून (ता. २३) ढगाळ वातावरणासह किरकोळ पाऊस होईल. त्यानंतर १ नोव्हेंबरपर्यंत जळगाव, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, उत्तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशीम, अमरावती, बुलडाणा, अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत पावसाची मुख्यतः उघडीप राहील.

बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांमुळे दक्षिण भारतात पाऊस पडतो. या ईशान्य, पूर्वेकडील वाऱ्यांमुळे २६ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह किरकोळ पाऊस राहील. या पावसाने नुकसान होणार नसल्याचे श्री. खुळे यांनी सांगितले.

Leave a Comment