E-pic pahni ; ई-पिक पाहणी केली पण तुमची ई-पिक यशस्वी झाली का…
E-pic pahni ; शेतकऱ्यांना आपल्या 7/12 वर पिकांची नोंद करण्यासाठी म्हणजेच ई-पिक पाहणी करण्यासाठी सरकारने मुदतवाढ दिली आहे. जर तुम्ही ई-पिक पाहणी केली असेल तर तुमची ई-पिक पाहणी यशस्वी झाली का हे तपासून पहा. जर ई-पिक पाहणी यशस्वी झाली नाही किंवा ई-पिक पाहणी केली नाही तर कोणत्याही शासकीय अनुदानाचा लाभ मिळणार नाही. पिकविमा, नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ई-पिक पाहणी करणे आवश्यक आहे.
तुम्ही ई-पिक पाहणी केली असेल तर तुमची ई-पिक पाहणी यशस्वी झाली का हे कसे पहावे याबाबत स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया.
🟠 सर्वप्रथम प्ले स्टोअर वरुन ई-पिक पाहणी चे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova
🔴 ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर गावाचे खातेदारांची ई-पिक पाहणी या पर्यायावर क्लिक करा.
🟣 त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी दिसेल.
🔵 या यादीमध्ये ई-पिक पाहणी यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांचे नाव हिरव्या रंगाच्या कलर मध्ये दिसेल
🟡 ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक केली नाही किंवा यशस्वी झाली नाही अशा शेतकऱ्यांचे नाव हिरव्या रंगाच्या कलर मध्ये दिसणार नाही.
🔺 जर तुम्ही नुकतीच ई-पिक पाहणी केली असेल तर तुमचे नाव अपडेट होण्यासाठी वेळ लागेल.
नुकसान भरपाई, पिकविमा इतर शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ई-पिक पाहणी करणे बंधनकारक आहे. ई-पिक पाहणी करण्यासाठी शासनाने 23/सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे तरी या वेळात ई-पिक पाहणी करने बाकी असेल तर ई-पिक पाहणी करून घ्या. तसेच हि माहिती ईतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या पाहण्यासाठी आपल्या whatsaap group मध्ये सामील व्हा…