E-pik pahani ई-पिक पाहणी केली नाही तर सरकारी मदत मिळणार नाही…
E-pik pahani मागिल दोन वर्षापासून सरकारने आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी (e-pik pahani) ई-पिक पाहणी या मोबाईल ॲप्लिकेशन च्या माध्यमातून करण्याची व्यवस्था केली आहे. ई-पिक पाहणी केल्यानंतर आपल्याला शासकीय योजनाचा लाभ मिळतो. अन्यथा पिक विमा, नुकसान भरपाई यासारखे लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. शासनाने ई-पिक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी न केल्यास काय होईल ?
ई-पिक पाहणी च्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकाची नोंदणी करु शकतात. जर ई-पिक पाहणी नाही केली तर तुमची जमीन पुर्णपणे पडिक गृहीत धरून तुम्हाला शासकीय योजनाचा तसेच दुष्काळी अनुदान, पिकविमा तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार नाही. आपल्या शेतात कोणते पिक आहे हे ई-पिक पाहणी च्या आधारे ग्राह्य धरले जाते..
ई-पिक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ किती ?
खरिप पिकाची ई-पिक पाहणी करण्यासाठी शासनाने 23/सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 23/सप्टेंबर पर्यंत ई-पिक पाहणी न केल्यास शेतकऱ्यांना शासकीय योजनाचा तसेच पिक विम्याचा लाभ मिळणार नाही.
तांत्रिक अडचणी मुळे खुप शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी पुर्ण झालेली नाही. तरी तुमची ई-पिक पाहणी पुर्ण झाली का हे चेक करुन नसेल झाल्यास पुन्हा लवकर ई-पिक पाहणी पुर्ण करावी. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार अद्याप राज्यातील भरपूर शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी करणे प्रलंबित आहे. तरी या शेतकऱ्यांनी शासकीय योजनाचा तसेच नूकसान भरपाई, पिकविमा मिळवण्यासाठी ई-पिक पाहणी पुर्ण करावी.
यंदा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे आणि विमा कंपनीकडून अग्रीम पिकविमा मंजूर करण्यात येत आहे. हा पिकविमा मिळवण्यासाठी तुम्हाला ई-पिक पाहणी पुर्ण असणे आवश्यक आहे. ई-पिक पाहणी पुर्ण नसेल तर तुम्हाला पिकविमा मिळणार नाही..