Harbhara top verity ; हरभरा टॉप व्हेरायटी एकरी 15 क्विंटल पर्यंत उत्पादनHarbhara top verity ; हरभरा टॉप व्हेरायटी एकरी 15 क्विंटल पर्यंत उत्पादन

Harbhara top verity ; हरभरा टॉप व्हेरायटी एकरी 15 क्विंटल पर्यंत उत्पादन

Harbhara top verity ; रब्बी हंगामाला सुरूवात होत असून आपल्या महाराष्ट्रात रब्बी हंगामात हरभरा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. यंदा बहुतांश भागात अतिवृष्टी झाली असल्याने खरिपातील पिकांचे नुकसान झाले आहे. खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढणार आहे. हरभरा पिकांचे एकरी 15 क्विंटल पर्यंत उत्पादन घेण्यासाठी वेगवेगळ्या वेरायटी बाबत विस्तृत माहिती तसेच वेगवेगळ्या वाणाची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

 

वाणांचे नाव – विराट या वाणांचा कालावधी 110 ते 115 दिवसाचा असुन टपोरे दाणे, मर रोगास प्रतिकारकक्षम, विशेष महाराष्ट्रासाठी प्रसारित, 100 दाण्यांचे वजन 35 ग्रॅम एवढे आहे. जिरायत जमीनीत हेक्टरी 10 ते 12 क्विंटल पर्यंत उत्पादन तसेच बागायत जमीनीत हेक्टरी 30 ते 32 क्विंटल पर्यंत उत्पादन. 

 

वाणांचे नाव – कृपा या वाणांचा कालावधी 105 ते 110 दिवसाचा आहे. जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण 100 दाण्यांचे वजन 60 ग्रॅम पर्यंत असते. मर रोग प्रतिकारकक्षम पांढरे दाणे महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यासाठी प्रसारित आहे. या वाणाचे सरासरी उत्पादन हेक्टरी 16 ते 18 क्विंटल पर्यंत आहे.

 

वाणांचे नाव काक-: 2 पीकेव्ही : 2 – या कालावधी 100 ते 105 दिवसाचा असुन अधिक टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारकक्षम 100 दाण्यांचे वजन 40 ग्रॅम पर्यंत आहे. सरासरी उत्पादन 26 ते 28 क्विंटल पर्यंत आहे. 

वाणांचे नाव – पीकेव्ही – या वाणांचा कालावधी 100 ते 110 दिवसाचा असुन टपोरे दाणे, मर रोगास मध्यम प्रतिकारकक्षम, विदर्भकरिता प्रसारित केला आहे. 100 दाण्यांचे वजन 50 ग्रॅमपर्यंत आहे. हेक्टरी उत्पादन 16 ते 18 क्विंटल पर्यंत आहे. 

 

वाणांचे नाव – फुले विक्रांत ; या वाणांचा कालावधी 105 ते 110 दिवसाचा असुन पिवळसर तांबूस मध्यम आकाराचे दाणे असतात. बागायती पेरणी साठी योग्य असुन हेक्टरी उत्पादन 40 क्विंटल पर्यंत असते. तर सरासरी 25 क्विंटल पर्यंत उत्पादन क्षमता आहे. 

 

वाणांचे नाव – पीडीकेव्ही कांचन  :  या वाणांचा कालावधी 100 ते 110 दिवसाचा असुन मर रोग प्रतिकारक्षम असुन टपोरे दाणे आहेत विशेष विदर्भ विभागासाठी प्रसारित केला असुन हेक्टरी उत्पादन क्षमता 30 क्विंटल पर्यंत आहे. 

 

वाणांचे नाव – पीडीकेव्ही कनक  ; या वाणांचा कालावधी : 105 ते 110 दिवसाचा असुन उंच वाढणारी जात आहे. यांत्रिक पद्धतीने काढणीसाठी योग्य असुन ओलीताखाली लागवडीसाठी शिफारस आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातसाठी प्रसारित असुन हेक्टरी उत्पादन क्षमता 20 क्विंटल पर्यंत आहे. 

 

वाणांचे नाव – जाकी – 9218   महाराष्ट्र साठी प्रसारित मर रोगास प्रतिकारक्षम आहे. जिरायती क्षेत्रावर हेक्टरी उत्पादन क्षमता 16 ते 18 क्विंटल पर्यंत आहे.तसेच बागायती मध्ये 28 क्विंटल पर्यंत उत्पादन क्षमता आहे. 

 

वाणांचे नाव – दिग्विजय   या वाणांचा कालावधी जिरायती साठी 90 ते 95 दिवसाचा असुन बागायती साठी 110-115 दिवसाचा असुन पिवळसर तांबूस दाणे, मर रोगास प्रतिकारक्षम, जिरायती बागायत तसेच उशिरा पेरणीत योग्य आहे. जिरायती उत्पादन क्षमता 14 ते 15 क्विंटल पर्यंत आहे. बागायती क्षेत्रात 30 ते 35 क्विंटल पर्यंत आहे. 

 

 

वाणांचे नाव – विशाल  या वाणांचा कालावधी बागायती साठी 105 ते 115 दिवसाचा असुन आकर्षक पिवळसर टपोरे दाणे, मर रोगास प्रतिकारक्षम आहे. घाटे आकाराने मोठे असून गर्द हिरवे असतात. सरासरी उत्पादन क्षमता 20 क्विंटल पर्यंत आहे.

 

 

वाणांचे नाव – विजय  या वाणांचा कालावधी जिरायती 90 दिवस तर बागायती 110 दिवसाचा आहे. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असुन मर रोगास प्रतिकारक्षम, जिरायती बागायत आणि उशिरा पेरणीस योग्य आहे. सरासरी उत्पादन 20 क्विंटल पर्यंत आहे. 

 

 

वाणाचे नाव – फुले विश्वराज  या वाणांचा कालावधी 105 दिवसाचा असुन पिवळसर तांबूस रंगाचा, मध्यम दाणे,जिरायती पेरणी साठी योग्य, मर रोग प्रतिकारक्षम, पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित सरासरी उत्पादन 25 क्विंटल पर्यंत आहे. 

 

वाणांचे नाव – बीडीएनजी (BDNG) 797 (आकाश)

या वाणांचा कालावधी 105 ते 110 दिवसाचा असुन मराठवाडा विभागासाठी प्रसारित, मररोग प्रतिकारक्षम, मध्यम आकाराचे दाणे, अवर्षण प्रतिकारक्षम उत्पादन क्षमता जिरायती उत्पादन 15 क्विंटल पर्यंत तसेच बागायती उत्पादन 22 क्विंटल पर्यंत आहे.

Leave a Comment