Havaman aandaj ; राज्यात पुन्हा अतिवृष्टीचे संकेत या जिल्ह्यांना धोका..

Havaman aandaj ; राज्यात पुन्हा अतिवृष्टीचे संकेत या जिल्ह्यांना धोका..

Havaman aandaj ; सध्या खरिप पिकाची काढणीचा कालावधी सुरू आहे. आणि 20/सप्टेंबर पासून राज्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. अनेक हवामान तज्ञांकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ओडिशाच्या दक्षिणेकडील भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. या हवामान प्रणालीची वाटचाल हि मध्यप्रदेशच्या दिशेने आहे. याच्या प्रभावाने विदर्भ, मराठवाडा , मध्य महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असे हवामान तज्ञांकडून सांगितले जात आहे.

 

या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज..

राज्यात 20/सप्टेंबर पासून राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज आहे. बुलढाणा, अकोला, भंडारा, नागपूर, अमरावती, गडचिरोली चंद्रपूर, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांत दि. 20/ , ते 23/ पर्यंत 30 मिमी पासून 65 मिमी पर्यंत पावसाचा अंदाज आहे. म्हणजेच जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, सोलापूर, धाराशिव, बीड, नगर, लातूर या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि नगर, सोलापूर या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या खरिप पिकाची काढणीचा कालावधी सुरू झाला आहे आणि अशा परिस्थितीत ओडिशामध्ये कमी दाब प्रणाली निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी सांगितली आहे.

 

हे वाचा – शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा ; पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबराव डख

पंजाबराव डख यांचा तातडीचा मॅसेज पुन्हा मुसळधार पाऊस सतर्कतेचा इशारा…

Leave a Comment