Havaman Andaj जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे
Havaman Andaj जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी नविन हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे .23 , 24 , 25 ऑगस्ट ला पाऊस कसा राहील याबाबत सविस्तर माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे. कोणत्या भागात पाऊस पडणार आहे, या लेखाच्या माध्यमातून पाहू .
कोकण
कोकणातील सिंधुदुर्ग , रत्नागिरी या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे . रायगड आणि ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे . पालघरला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे . उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार , धुळे , नाशिक, जळगाव या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे असा अंदाज जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे .
मराठवाडा
मराठवाड्यातील धाराशिव , नांदेड , छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर , लातूर , नांदेड , बीड , परभणी , हिंगोली , जालना या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे .
विदर्भ
पश्चिम विदर्भात बुलढाणा , अकोला , वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे . मध्य विदर्भात पण मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे .
पूर्व विदर्भातील चंद्रपूर , गडचिरोली , भंडारा या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे , असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . दक्षिण पश्चिम महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार , पून्हा सातारा जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस , आणि सोलापुरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार , पुणे आणि नगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे .
अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत . हे चक्राकार वारे दोन ते तीन दिवस राहणार आहेत. या चक्राकार वाऱ्याचा परिणाम पावसावर होणार आहे . या हवेचा दाब दोन तीन दिवस राहणार असल्याची माहिती हवामान खात्याचे जेष्ठ तज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे .