Ladki bahin yojana ; लाडकी बहिण योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे . 21 ते 65 वयोगटातील सर्व महिलांना दरमहा 1500 हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला असून , 31 जुलै पर्यंत ज्या महिलांचे अर्ज अप्रोवल झाले आहे अशा महिलांना दोन हप्त्यांचे मिळून असे एकूण 3000 हजार रुपये, आधार लिंक असलेल्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत .
31 जुलै पर्यंत अर्ज मंजूर झाले , परंतु अजूनही काही महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले नाही , अशा महिलांनी आपले आधार सेडिंग स्टेटस चेक करावे . 31 जुलै पर्यंत अर्ज अप्रोवल झालेल्या महिलांना 31 ऑगस्ट पर्यंत पैसे जमा होणार आहे .
लाडकी बहिण योजनेत ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केले आहे , अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकत्रित तीन हप्त्यांचे मिळून असे एकूण 4500 रुपये जमा होणार आहे . त्यासाठी त्या महिलांचे अर्ज अप्रोवल झालेले असावे , बॅंक खाते आधार लिंक असावे आणि अर्ज मंजूर झालेला असावा . या तीन गोष्टी पूर्ण असणाऱ्या महिलांना सप्टेंबर महिन्यात लाडकी बहिण योजनेचे तीन हप्ते एकत्रितपणे जमा होणार आहे . ज्या महिलांचे आधार कार्ड बॅंकेला लिंक नसेल, अशा महिलांनी लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यावे .