Ladki bahin yojana या महिलांना 3000 हजार रुपये मिळणार नाही, आदिती तटकरे यांनी दिली माहिती….

Ladki bahin yojana या महिलांना 3000 हजार रुपये मिळणार नाही, आदिती तटकरे यांनी दिली माहिती….

Ladki bahin yojana लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आतापर्यंत दोन हप्त्यांचे एकत्रितपणे वितरण करण्यात आले आहे. पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून एकूण 3000 हजार रुपये जमा झाले आहेत. परंतु अनेक कारणांमुळे अजूनही काही महिलांना लाडकी बहिण योजनेमध्ये अर्ज करता आलेला नाही, अशा महिलांना 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे, असा 2 सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते अर्ज मंजूर होऊन देखील आले नाही, अशा महिलांनी आपले बॅंक खाते आधार लिंक आहे का नाही चेक करून घ्यावे. आधार सिडिंग स्टेटस ऑक्टिव करून, लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यावा.

 

लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी उर्वरित महिलांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावा. 30 सप्टेंबर पर्यंत हे अर्ज सादर करता येतील. परंतु सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे हप्त्ये मिळणार नाही, असा या शासन निर्णयात उल्लेख केला आहे.

सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना मागील दोन हप्त्यांचे 3000 हजार रुपये मिळणार नाही. फक्त सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मानधन मिळणार आहे. अजूनही ज्या महिलांचे अर्ज करणे बाकी असेल, तर त्या महिलांनी 30 सप्टेंबर पर्यंत लवकरात लवकर अर्ज दाखल करून, लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यावा.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज बाकी असेल, अशा महिलांनी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज पूर्ण करून घ्यावे. यानंतर जर शासनाने पुन्हा अर्जाची तारीख वाढवली तर, त्याबद्दल लवकरात लवकर माहिती दिली जाईल.

Leave a Comment