Ladki bahin yojna तुमच्या खात्यात 3000 हजार रुपये जमा झाले नाही , काय करावे ..‌.

 

Ladki bahin yojna लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना त्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे मिळून एकूण 3000 हजार रुपये जमा झाले आहेत . परंतु अजूनही काही महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला नाही, तर काय करावे , या लेखाच्या माध्यमातून पाहू .

सर्वात आगोदर हे तपासा

ऑनलाईन अर्ज चेक केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर दाखवत आहे का ? अर्जाची स्थिती तपासल्यावर अर्ज रिजेक्ट Rejected असं दाखवते का ? या गोष्टी अर्जाची स्थिती तपासून घेतल्यानंतर त्या अर्जाची त्रुटी लक्षात येईल .

पैसे न मिळन्याचे ही कारणं आसू शकतात

लाडकी बहिण योजनेचा हप्ता न मिळण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे , बॅंक खाते आधार लिंक नसणे . बॅंक खाते आधार लिंक नसेल तर , लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झालेले नाही . ज्या महिलांचे खाते आधार लिंक नसेल तर , त्या महिलांनी आपले बॅंक खाते आधार लिंक करून घ्यावे .

Ladki bahin yojna ; पैसे कधी जमा होतील ?

अर्ज दाखल केल्यानंतर तुमच्या अर्जासमोर Pending , Review असं दिसत असेल तर , घाबरण्याचे कारण नाही , तुमच्या अर्जाची छाननी सुरू आहे , असं समजावे . अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील महिन्यात एकत्रित असे तीन हप्त्यांचे मिळून 4500 रुपये , आधार लिंक असलेल्या बॅंक खात्यात जमा होणार आहे .

Leave a Comment