Maharashtra weather ; आज या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा

Maharashtra weather ; आज या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : राज्यातून मॉन्सूनने माघारी घेतली असली तरी काही जिल्ह्यात मात्र पाऊस सुरू आहे. पुढील काही दिवस राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.येत्या चार दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Havaman aandaj)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (५ ऑक्टोबर) रोजी राज्यातील धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, जालना परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात
जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

आज 05/ ऑक्टोबर रोजी पाऊस राज्याच्या बहुतांश भागात पडण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये ठाणे व रायगड या ठिकाणी 06/ तारखेला तर रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये आणि 07/ ऑक्टोबर दरम्यान तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात सात तारखेला बऱ्याच जिल्ह्यात तर आठ तारखेला संपूर्ण विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात व विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Comment