Mera ration ; रेशनकार्डावरील ऑनलाईन नाव कसे जोडावे किंवा कट करावे, पहा सविस्तर

Mera ration 2.0 नमस्कार मित्रांनो , केंद्र सरकारने सामान्य व्यक्तीचा वेळ वाया जाऊ नये म्हणून , शासकीय कामासाठी तहसील कार्यालयात , किंवा कोणत्याही प्रकारच्या कार्यालयात जाण्याची गरज भासू नये, यासाठी सर्व ऑनलाईन काम घरबसल्या उपलब्ध करून दिले आहेत .

रेशनकार्डाचा वापर अनेक शासकीय कामासाठी केला जातो . रुग्णांलयात , धान्य वितरण करण्यासाठी , आता सद्ध्या सुरू असलेल्या माझी लाडकी बहिण योजना , अन्नपूर्णा योजना या योजनांसाठी रेशनकार्ड आवश्यक होते . परंतु अनेक महिलांचे लग्न झाल्यानंतर , किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तीचे रेशनकार्डावरील नाव ऑनलाईन नाव केंद्र सरकारच्या ऑफिशियल ऑप्लिकेशनवरून दोन मिनिटात नाव कट करून शकतात . त्यासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्याची गरज नाही . तर रेशनकार्डावरील ऑनलाईन नाव कसे कट करावे , याबाबत सविस्तर माहिती या लेखात आपण पाहू .

Mera ration ; रेशनकार्डावरील ऑनलाईन नाव कसे कट करावे याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे….

 

1 ) सर्वप्रथम प्ले स्टोअर वरून (Mera ration 2.0) हे ऑप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे .

2) त्यानंतर भाषा निवडून , आधार क्रमांक टाकून घ्या . कॅप्चा टाकून, तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल वर आलेला ओटीपी टाका .

3 ) त्यानंतर ऑप्लिकेशनवर चार अंकी कोणताही एक पासवर्ड टाका .

4 ) वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर तुमचे रेशनकार्ड ओपण होईल .

5 ) ऑप्लिकेशनवर रेशनकार्ड ओपण झाल्यावर सर्वात पहिले ( manege family details ) या पर्यायावर क्लिक करा .

6 ) त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीचे नाव कट करून घ्यायचे आहे , त्या व्यक्तीच्या नावासमोर असलेल्या डिलिट या पर्यायावर क्लिक करा .

7 ) डिलिट या पर्यायावर क्लिक केल्यावर, पुन्हा कन्फर्म करुन घ्या . नंतर तुम्हाला नाव कमी का करायचे आहे ते विचारले जाईल , ते निवडा. नंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल वर ओटीपी येईल तो ओटीपी टाका .

आलेला ओटीपी टाकल्यानंतर तुमचे रेशनकार्ड नाव कमी करण्यासाठी, तहसिल कार्यालयात रिक्वेस्ट केला जाईल. तुमचे रेशनकार्ड तहसील कार्यालयातून जेव्हा रिक्वेस्ट ऑक्सेप्ट केले जाईल , तेव्हा तुमच्या रेशनकार्ड वरील नाव कट होईल . या प्रोसेस चार वापर करून तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलवरून रेशनकार्ड वरील नाव ऑनलाईन कट करून शकतात .
अधिक माहितीसाठी खालील युट्यूब व्हिडिओ YouTube video पहा .

Leave a Comment