Monsoon news ; महाराष्ट्रातून मान्सून चा परतीचा प्रवास सुरू…
Monsoon news : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सूनने) परतीचा प्रवास पुन्हा सुरू करत मोठी माघार घेतली आहे. दि. 05/ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या नंदूरबार जिल्ह्याच्या काही भागांतून माघार घेतली आहे. दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी म्हणजेच मॉन्सूनने 23/ सप्टेंबर रोजी वायव्य राजस्थान आणि कच्छमधून परतीचा प्रवास सुरू केला. 24 सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागासह पंजाब आणि हरियानाच्या काही भागातून मॉन्सून परतल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थबकली. 02 ऑक्टोबर रोजी तब्बल आठ दिवसांनी मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे.
दि. 05/ऑक्टोंबर रोजी मॉन्सूनने उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशच्या आणखी काही भागांसह, उत्तर महाराष्ट्र आणि अरबी समुद्राच्या आणखी काही भागातून मुक्काम हलविला आहे.
सुलतानपूर, पन्ना, नर्मदापुरम, खारगाव, नंदुरबार, नवसारीपर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सूनच्या परतीस पोषक हवामान झाल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य प्रदेश, गुजरातच्या उर्वरित भागासह, महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.