Monsoon news ; पंजाबराव डख म्हणतात 19/, 20/, 21/ ला पाऊस

Monsoon news ; पंजाबराव डख म्हणतात 19/, 20/, 21/ ला पाऊस

Monsoon news ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 16/ऑक्टोंबर रोजी नवीन अंदाज वर्तवला आहे. या अंदाजामध्ये डख यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सून राज्यातून 24/ऑक्टोंबर ला निघून जाणार असल्याची माहिती दिलीय. तसेच 19/ ते 21/ या तीन दिवसात काही भागाना पावसाची शक्यता वर्तवलीय.पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज पाहुया.

 

पंजाबराव डख यांनी सांगितले की मान्सुनने परत फिरण्याची तयारी सुरु केली असून महाराष्ट्रातून वरुणराजा दि. 24/ऑक्टोबर पर्यंत निघून जाईल. या दरम्यान ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. 05/ नोव्हेंबर दरम्यान राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरूवात होईल असेही डख यांनी सांगितले आहे.

 

दि. 18/ऑक्टोबरला महाराष्ट्रातील जळगाव कडून मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू होणार आहे. तसेच मराठवाडा व आजूबाजूच्या परिसरातून 24 तारखेला मान्सून माघारी परतणार आहे. दरम्यान 19/, 20/,21/ ऑक्टोंबर रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 19/ऑक्टोबर ते 21/ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात लातूर, नांदेड,यवतमाळ, बीड, हिंगोली,वाशीम,अकोला, धाराशिव, जालना, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टी या भागात भाग बदलत पावसाची शक्यता असेल.

 

24/ऑक्टोंबर पासून पाऊस पुर्णपणे निघून जाणार आहे आणि 05/ नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. (हवामान अभ्यासक पंजाब डख)

 

 

Leave a Comment