Monsoon news ; मान्सूनचा मुक्काम वाढणार!सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये धो धो पाऊस

Monsoon newsMonsoon news ; मान्सूनचा मुक्काम वाढणार!सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये धो धो पाऊस

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने भारतात मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबरअखेर लांबण्याची शक्यता आहे.ला निना आणि विकसित होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबरमध्ये सुरू होतो. १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून भारतातून बाहेर निघून जातो. पण यंदा ‘ला निना’मुळे भारतात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

रब्बीच्या पेरणीला फायदा

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार आहे. परतीच्या पावसाने रब्बीच्या पेरणीला फायदा होणार हे नक्की.

पिकांचे नुकसान (Monsoon news)

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून खरीपाची काढणी सुरू होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे कापणी केलेले भात, सोयाबीन, मका आणि इतर पिकांचे नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर या पावसाने विहिरी, तलाव, बंधारे भरले जातील, पाणीसाठा वाढेल, त्याचा फायदा गहू, हरभरा आदी रब्बी पिकांना होनार आहे.

Monsoon news ; पाऊस लांबला तर तोटा होणार की फायदा?

सोयाबीन, मका, तांदूळ, कापूस या पिकांचे कापणीच्या काळात पाऊस सुरू राहिल्यास नुकसान होऊ शकते.

पाणीसाठा वाढून रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो.

Leave a Comment